Pune : सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक


एमपीसी न्यूज – कारगील परिसरात सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाच्या बँक खात्यात सायबर चोरट्यांनी  (Pune) फसवणूक प्रकरणातील 525 रुपये जमा केले होते. संबंधित बँक खाते गोठविण्यात आल्याने खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जवानाला अडीच हजार किलोमीटरचा प्रवास  करुन पुणे गाठावे लागले. सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार जवानाने केल्यानंतर खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.

Today’s Horoscope 12 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याबाबत अधिक माहिती अशी की, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहे. सायबर चोरट्यांनी ज्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. ते खाते गोठविण्यात येते. खाते गोठविण्यात आल्यानंतर चोरटे रक्कम काढू शकत नाही. लष्करी जवानाच्या खात्यावर चोरट्यांनी 525 रुपये जमा केल्यानंतर जवानाला बँक खात्यातून रक्कमही काढता येत नव्हती. बँक व्यवहार ठप्प झाल्यानंतर जवान कारगील परिसरातील बँकेत गेले होते. चौकशीत बँक खाते पुणे पोलिसांनी गोठविल्यची माहिती जवानाला मिळाली. त्यानंतर जवानाने अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून पुणे गाठले. जवानाची सर्व रक्कम संबंधित खात्यात होती. त्यामुळे जवानाने तातडीची सुटी घेऊन पुण्यात आला.

पोलिसांनी जवानाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. चौकशीत खाते जवानाचे असल्याचे समजल्यानंतर संबधित खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे, असे पत्र पोलिसांनी बँकेला दिले. संबंधित प्रक्रिया पार पडल्यानतंर जवानाचे खाते पुन्हा कार्यान्वित (Pune) झाले.