Pune: सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने फोडली


एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील (Pune)राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी 7 थर लावून फोडली. मंगळवारी रात्री 9 वाजून 8 मिनीटांनी दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेला भव्य 30 फूट उंचीचा एलईडी लाईट देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Untitled design 2024 08 27T220621.630

Alandi: आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर- कैलास केंद्रे

कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये 51  हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला.

सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट मधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.