Pune : कृष्ण हा अष्टपैलू आणि पूर्ण पुरुष – डॉ.सदानंद मोरे


एमपीसी न्यूज : कै.कमला सुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या ‘श्रीमद भागवतम्’ या मूळ (Pune) इंग्रजी ग्रंथाच्या शैला पटवर्धन यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे आणि अनुवादक शैला पटवर्धन यांच्या हस्ते झाले. भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन, पुणे केंद्राच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘पुराणांचा भारतीय मनांवर खोल परिणाम आहे. कृष्णाचा उल्लेख पद्म पुराणात, भागवत पुराणात येतो. श्रीकृष्ण चरित्र हे भागवत पुराणात सविस्तरपणे येते. कृष्ण हा रसिक, अष्टपैलू, मुत्सदी आणि नर्तक होता. कृष्ण अवतारात 16 कला प्रगट झाल्या आहेत. म्हणून तो पूर्ण पुरुष होता. महाभारतातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश गीता म्हणून प्रसिद्ध आहे.

वारकरी परंपरा ही कृष्णाची परंपरा मानली जाते. कृष्णाने अर्जुनाला जसा उपदेश केलेला आहे, तसा उद्धवालाही केलेला आहे. त्यामुळे भगवद्गीता बरोबर उद्धव गीताही महत्वाची आहे. महाराष्ट्रात गीतेवर लिहिण्याची अखंड परंपरा आहे.  ज्ञानेश्वर, दासोपंत, वामन पंडित, विनोबा भावे अशी ही परंपरा आहे.

Nigdi : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी; इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

त्यामानाने भागवताकडे महाराष्ट्रात दुर्लक्ष झाले. एकनाथ महाराजांनंतर फार लिखाण झाले नाही. उत्तरेत (Pune) भागवतावर भर देण्यात आला. अलिकडच्या काळात झालेला भागवत अनुवाद हा शैला पटवर्धनांचा अनुवाद आहे, असे म्हणावे लागेल.

मराठी वाचकाला या अनुवादाचा उपयोग होईल. परंपरेवर प्रेम करणाऱ्या वाचकासाठी हा अनुवाद उपयुक्त ठरेल’. भारतीय विद्या भवनच्या परंपरेला अनुरूप असा हा पुस्तकाचा विषय असल्याने प्रकाशनासाठी ते निवडले गेले. वैचारिक भागवत परंपरेच्या अभ्यासासाठी ते संग्राह्य ठरेल’, असे प्रतिपादन प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले.

लेखिका शैला पटवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. खा.कुमार केतकर, सुधाकर जोशी, शुभदा जोशी, श्याम भुर्के, कुमार साठे आदी मान्यवर तसेच पटवर्धन कुटुंबीय उपस्थित होते.