Pune : गोपाळ देवांग, महादेव कसगावडे, मिलिंद ढमढेरे यांच्यासह दहा जणांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार


एमपीसी न्यूज : अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धे व (Pune) प्रशिक्षक गोपाळ देवांग, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्यासह दहा जणांना दिनांक 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद जीवन गौरव 2024 या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव श्रीधरन तंबा यांनी येथे या पुरस्कारांची घोषणा केली. मेजर ध्यानचंद यांचा जयंतीनिमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कार विजेत्यांमध्ये अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धे व प्रशिक्षक गोपाळ देवांग, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय हॉकीपटू रमेश पिल्ले, साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल आरती पाटील, माजी आंतरराष्ट्रीय ॲथलिट मेर्लीन जोसेफ, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व मानद व्याख्याते डॉक्टर मिलिंद ढमढेरे, साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूल मोशी या संस्थेचे व्यवस्थापक सुधाकर विश्वनाथन, माजी आंतरराष्ट्रीय हॉकी पंच सतिंदर सिंग वालिया, माजी राष्ट्रीय हॉकीपटू आनंद साळवी, ज्येष्ठ फुटबॉलपटू व संघटक संदेश बोर्डे यांचा समावेश आहे.

PCMC : अग्निशमन विमोचक परीक्षेसाठी 27 अधिकार्‍यांची नियुक्ती

गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी खडकी येथील पुणे रेल्वे पोलीस (Pune) मुख्यालय औंध रोड येथे सायंकाळी चार वाजता हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल हिंजवडीच्या प्रिन्सिपल शर्मिला कदम आणि पुणे रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

यांची उपस्थिती लाभणार – 

तसेच या समारंभास माजी राष्ट्रीय हॉकीपटू स्टॅन्ले डिसूझा, देवदास मार्टिन, गिल्बर्ट पिंटो, अजय परदेशी चिन्मय कोराड माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू लीला वालिया पब्लिक स्कूल हिंजवडीच्या समन्वयक सीमा विश्वकर्मा, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कांबळे, (Pune) एफसीआयचे व्यवस्थापक व्हिक्टर ॲंथोनी हेही उपस्थित राहणार आहेत.