Pune : जागेची नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली 20 हजार रुपयांची लाच


एमपीसी न्यूज : जमिनीच्या नोंदणी प्रकरणी (Pune) रांझे येथील तलाठ्याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि. 21) रांझे, तालुका भोर, पुणे येथे करण्यात आली.

या प्रकरणी सुधीर तेलंग (वय 56) या तलाठी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 31 वर्षीय तरुणाने राजगड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

PCMC : शाळांमध्ये मध्ये ‘सखी सावित्री’ समिती गठीत करा –  सीमा सावळे

सविस्तर माहिती, अशी की तक्रारदारास आपल्या जागेची ऑनलाइन फेरफार नोंद ग्राह्य धरण्यासाठी आणि जागेच्या 7/12 उताऱ्याची नोंद करण्यासाठी  सुधीर तेलंग यांची भेट घेतली होती. सदर काम करण्यासाठी प्रती गुंठयास 1000 रुपये प्रमाणे 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. एसीबीने सापळा लावून तेलंग  यांना तडजोडीअंती 20000 रुपयांची लाच घेताना रंगेहात (Pune) पकडले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.