Pune : पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव 2024 साजरा करण्यासाठी ‘मूर्ती आमची, किमंत तुमची’ उपक्रमाचे आयोजन

[ad_1]

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिके (Pune) तर्फे पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या घरी गणपती बसवताना नैसर्गिक साहित्य, जैवविघटनशील व पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून मूर्तीची सजावट करण्यात यावी व POP ची मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.

पुणे महानगरपालिका पर्यावरण विभाग व लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या मदतीने फक्त शाडू मातीच्या मूर्तीसाठी ‘मूर्ती आमची, किमंत तुमची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शाडू मातीचा वापर करून भक्ती संगम प्रकारच्या मातीच्या मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती अवघ्या दोन तासात पाण्यात विरघळतात व विसर्जन केल्यानंतरचे पाणी घरगुती कुंडीमध्ये वापरता येते.

Pimpri : स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाची एफआयपीएससीबीवर मात

‘मूर्ती आमची, किमंत तुमची’ हा उपक्रम घोले रोड (Pune)आर्ट गॅलरी, शिवाजीनगर येथे दिनांक 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत राबवण्यात येणार असून नागरिकांसाठी पर्यावरण पूरक मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo

[ad_2]