[ad_1]
एमपीसीन्यूज – पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Pune ) पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली असून येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे . अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ दिली आहे.
पुणे ते दुबई ही विमानसेवा दररोज सुरु होणार असून पुणे ते बँकॉक ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु होणार आहे.
पुणे ते बँकॉक हि विमानसेवा पूर्वी सुरू होती. ती सेवा कोविडच्या काळात बंद झाली होती. ती अजून सुरू झालेली नाही. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरु झाल्याने यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांचे ट्विट
पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे !
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
[ad_2]