Pune : पुणे महानगरपालिकेतर्फे क्लीन एअर प्रोग्रामचे आयोजन


एमपीसी न्यूज : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत ‘Clean Air for Blue Skies’  हा स्वच्छ हवा बाबतचा (Pune ) आंतरराष्ट्रीय दिवस  ‘International Day of Blue Skies’ दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिकेतर्फे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

WhatsApp Image 2024 09 06 at 5.02.40 PM 1

सदर कार्यक्रमांमध्ये मा.महापालिका आयुक्त,  डॉ.राजेंद्र भोसले व मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते क्लीन एअर बाबतचा बलून रिलीज करण्यात आला. त्यानंतर स्वच्छ हवा संदर्भातला सिग्नेचर कॅम्पेन घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण विभागाचे उप- आयुक्त संजय शिंदे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम या महत्त्वकांक्षी कार्यक्रमांमध्ये भारतातील 131 शहर असून महाराष्ट्र मध्ये 19 शहर आहेत व त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे.

WhatsApp Image 2024 09 06 at 5.02.41 PM

हवा प्रदूषण बाबत जनजागृती करण्यासाठी “इंटरनॅशनल डे ऑफ ब्लू स्काइस”  महत्त्वाचा दिवस असून नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पर्यावरणासाठी स्वच्छ हवेच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवणे हे आंतरराष्ट्रीय दिवसाचे उद्दिष्ट आहे.

WhatsApp Image 2024 09 06 at 5.02.41 PM 1

Alandi : आळंदी पोलिसांचे इंद्रायणी घाटावर मॉक ड्रील

या उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेच्या आवारात सिग्नेचर अभियान सुरू करण्यात आलेले आहे व सेल्फी काढून पर्यावरण (Pune) जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन माननीय उपायुक्त श्री संजय शिंदे यांनी केले. त्याचप्रमाणे महापालिकेतील सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी सौ. कळस्कर, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Image 2024 09 06 at 5.02.41 PM 2 WhatsApp Image 2024 09 06 at 5.02.42 PM

तसेच या निमित्ताने इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे विद्यार्थ्यांसाठी ‘Clean Air Now’  कार्यशाळा, घन वन/ देवराई  प्रदर्शन आणि Online Quiz असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

youtube.com/watch?v=IOYZxQkal4M