Pune: पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि वारंवारितेमध्ये वाढ

[ad_1]

एमपीसी न्यूज – आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाले. याप्रसंगी (Pune)पुणे मेट्रोने दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ केली आहे.

सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेमध्ये (सकाळी 8 ते सकाळी 11 व दुपारी 4 ते रात्री 8) दोन्ही मार्गिकांवरील (ॲक्वा व पर्पल) मेट्रोची वारंवारिता 7.5 मिनिटांवरून 7  मिनिटे करण्यात आली आहे. प्रवाश्यांसाठी दर 7 मिनिटाला ट्रेन उपलब्ध होणार आहे. वारंवारिता वाढल्यामुळे दोन्ही मार्गिकांवर 4 फेऱ्यांनी वाढ होणार आहे.

PCMC : शाळांमध्ये मध्ये ‘सखी सावित्री’ समिती गठीत करा –  सीमा सावळे

या आधी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या पर्पल मार्गिकेवर एकूण113  फेऱ्या होत असत, तर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून 117 फेऱ्या होणार आहेत. वनाझ ते रामवाडी या एक्वा मार्गिकेवर एकूण 114 फेऱ्या होत असत, तर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून 118 फेऱ्या होणार आहेत.

कमी गर्दीच्या वेळात (सकाळी 6 ते सकाळी 8, सकाळी 11 ते दुपारी 4 आणि रात्री 8 ते रात्री 10) मेट्रोची वारंवारिता हे पूर्वीप्रमाणेच 10 मिनिटांची असणार आहे.

याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भा.प्र.से) यांनी म्हंटले आहे, “मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये व वारंवारित्यामध्ये वाढ झाल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. प्रवाश्यांचा मेट्रो स्थानकांवरील विलंबकाळ (Waiting time) कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गिकांवर 8 फेऱ्यांची वाढ होऊन जास्त नागरिक मेट्रोतून प्रवास करू शकतील”.

 

 

[ad_2]