[ad_1]
एमपीसीन्यूज – राज्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठिकठिकाणी(Pune ) मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे.तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे ,रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये काल रात्रीपासून पाऊस आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Alandi: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींचा शिवसेना शिंदे गटाच्या बांधवां सोबत रक्षाबंधन सण साजरा
तर दुसरीकडे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहेत. नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असून 8428 क्युसेस वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा पहाटे उघडला आहे. सध्या कोल्हापूर आणि परिसरात पावसाची उघडीप आहे. मात्र धरण क्षेत्रात अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत.
[ad_2]