Pune: पुण्यातील इंदापूरजवळ एका बसचे दोन्ही टायर फुटल्याने भीषण अपघात ;सुदैवाने जीवितहानी नाही

[ad_1]

एमपीसीन्यूज – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून (Pune)दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवाशी बसला अपघात झाला आहे.ही बस पुण्याच्या दिशेने निघाली असतांना इंदापूर पासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे.

टायर फुटल्याने या बसने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली आहे . या बसमध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती मिळाली नाही. मात्र  बसमधील 10 ते 11 प्रवासी जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केलं आहे.

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि एनएचएआय चे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. खासगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सुदैवानं  कोणतीही जीवित हानी झाली नाही. या  अपघातात बसचे आणि  ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. इंदापूर पोलीस महामार्गावर अपघात ग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचे काम करत आहेत.

 

[ad_2]