Pune :वैज्ञानिक दृष्टिकोन हा डॉ. अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार;आदरांजली सभेत आठवणींना उजाळा


एमपीसी न्यूज – डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्याआधारे किती नावीन्यपूर्ण, समरसून, सर्जनशीलपणे जगता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अभ्यंकर होते, अशा शब्दात डॉ. अभ्यंकर यांना आदरांजली वाहण्यात आली.

विज्ञानवादी लेखक, लोकविज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वय 60) यांचे गुरुवारी (ता. 15) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी लोकविज्ञान संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान मंच, समाजविज्ञान अकादमी यांनी आदरांजली सभेचे बुधवारी (ता. 21) आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर, माजी खासदार प्रदीप रावत, अनिल जोशी, अनंत फडके, अविनाश पाटील, विशाल विमल, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. विवेक सावंत, शरद अष्टेकर, अजित अभ्यंकर, स्वानंद बेदरकर, कुमार नागे आदी उपस्थित होते.

WhatsApp Image 2024 08 21 at 9.36.30 PMWhatsApp Image 2024 08 21 at 9.36.31 PM

Pune : जागेची नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली 20 हजार रुपयांची लाच

नागरिक, हितचिंतक, चाहते, साहित्यिक, वाचक, कलाकार, कार्यकर्ते, डॉक्टर्स, अभ्यासक, विचारवंत यांनी त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिताचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘‘ग्रामीण समाजजीवन, ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये आरोग्याशी निगडित अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.’’

लोकविज्ञानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘‘अनेक डॉक्टर शिक्षणासाठी पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले. मात्र समाजनिष्ठा, तत्वनिष्ठतेमुळे डॉ. अभ्यंकर यांनी शिक्षण पूर्ण करून वाई येथे आपल्या कामाला सुरुवात केली.’’ ‘‘शंतनू अभ्यंकर यांचे राधिका सांत्वन हे नाटक मिळून सा-या जनीच्या व्यासपीठावर व्हावे अशी त्यांची खुप इच्छा होती. मात्र हे होवू शकले नाही याचे मला दुखः आहे.’’ असे ज्येष्ठ संपादिका गीताली वि. म. यांनी सांगितले. अनिल जोशी म्हणाले ‘‘सर्वसमावेशक विज्ञानवादी पुरोगामी विचाराचे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर होते.’’