[ad_1]
एमपीसी न्यूज – पुणे आणि पिपरीं-चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात रविवारी मध्यरात्रीपासून वाढ झाली असून यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो 85.90 झाला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ९० पैसे वाढ केली आहे. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५.९० रुपयांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.
Today’s Horoscope 09 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
कंपनीने म्हटले आहे की, सीएनजीची मागणी वाढत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतही वाढत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर वाढ झाली असून, ही वाढ नाममात्र 90पैसे प्रतिकिलो आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो 85.90 रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत 49 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत 27 टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची 29 टक्के बचत होत आहे.
याआधी जुलै महिन्यात सीएनजीचे दर वाढले होते. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत त्यामुळे वाहनाचालकांना याचा फटका बसत आहे.
[ad_2]