Pune : सोसायटीचा हिशोब मागितल्याने IT च्या संचालकावर बहिष्कार; पुण्यातील धक्कादायक घटना


एमपीसी न्यूज -सोसायटीचा हिशोब मागितल्यावरून सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी आयटी कंपनीच्या संचालकाला (Pune)वाळीत टाकले. तर तर एकाने पेटत्या दिव्यावर नारळ फोडला. त्यांची क्रूर चेष्टा केली. तसेच, त्यांच्या मुलीबरोबर सोसायटीत कोणीही खेळायला न जाऊ देता कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत लोकांचे सरंक्षण ३ अंतर्गत सोसायटीच्या 13 पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

रुपेश जुनावणे (वय 47), दत्तात्रय साळुंखे (वय ५०), अश्विनी पंडित (वय 60), अश्विन लोकरे (वय 50), सुनिल पवार (वय 52), जगन्नाथ बुर्ली (वय 50), अनिरुद्ध काळे (वय 50), सुमीर मेहता (वय 47), संजय गोरे (वय 45), शिल्पा रुपेश जुनावणे (वय 45, अशोक खरात (वय 50), वैजनाथ संत (सर्व रा. सुप्रिया टॉवर्स, नागरस रोड, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 44  वर्षाच्या व्यक्तीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा प्रकार 2015 पासून मार्च2024 पर्यंत सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सुप्रिया टॉवर्समध्ये 2003 मध्ये फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी भाड्याने दिला होता. नंतर ते फ्लॅटवर स्वत: राहण्यास आले. ते एका नामांकित आयटी कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, त्यांनी या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे हिशोब मागितला. तेव्हा रुपेश जुनावणे यांनी तो दिला नाही. तसेच, नंतर सोसायटीमध्ये राहणार्‍यांनी हेतुपुरस्पर त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना बहिष्कृत केले. वैजनाथ संतने पेटत्या दिव्यावर नारळ फोडला आणि इतर सदस्यांनी त्यांच्या कुटुंबियाची क्रुर चेष्टा केली. त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याच कार्यक्रमात भागही घेऊ दिला नाही. त्यांच्याबाबत दुजाभाव करुन मानसिक त्रास दिला. शिल्पा रुपेश जुनावणे या फ्लॅटचा जोराजोरात दरवाजा वाजवून त्यांच्या मुलीला घाबरवून सोडत असत. मुलीबरोबर कोणीही खेळत नाही.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त्या

दरम्यान फ्लॅट गिळंकृत करावयाचा असल्याने सर्व मिळून संगनमत करुन त्रास देत आहे. त्यांच्या कुटुंबियांची सोसायटीमध्ये बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नीला मानसिक त्रासास तोंड द्यावे लागले. पदाधिकार्‍यांनी सोसायटीच्या मोठ्या रक्कमेचा अपहार केला आहे, असे त्तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक निरीक्षक करांडे तपास करीत आहेत.