Pune Breaking : पुणे शहरात उद्या संध्याकाळपासून आठवडाभर वाहतूक होणार ठप्प; ‘हे’ 14 रस्ते राहणार बंद


एमपीसी न्यूज : गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या मध्यवर्ती भागात (Pune Breaking) भाविक आणि पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. याचाच अंदाज घेऊन पुणे शहर पोलिसांनी 14 हून अधिक रस्ते 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून उत्सवापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. 

यावर्षी 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक भेटी देतात. उत्सवाच्या सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर, म्हणजेच  गौरी पूजनानंतर भाविक गणेश मंडळात विशेषत: मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यासाठीच वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी मंगळवारी रस्ता बंद करण्याबाबत अधिसूचना जारी केली.

या आदेशात 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील 14 प्रमुख रस्ते गर्दी कमी होईपर्यंत दररोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे निर्बंध सरकारी वाहने आणि आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या वाहनांना लागू होणार नाहीत.

Sangavi : गणेश मंडळासमोर आरतीच्यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती

हे रस्ते बंद केले जातील: Pune Breaking 

1) लक्ष्मी रोड: हमजेखान चौक ते टिळक चौक: दारूवाला ब्रिज, महाराणा प्रताप रोड, मिर्झा गालिब रोड जंक्शन मार्गे वळवणे

2) शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट; अलका चौक व कुंभारवेस चौक मार्गे वळवणे

3) बाजीराव रोड : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक; केळकर रोड मार्गे वळवणे

4) टिळक रोड: महारत्ता चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक; बजाज पुतळा आणि पुरम चौक मार्गे वळवणे.

अंतर्गत रस्ते जे बंद केले जातील:

1) सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक.

२) दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक

3) कै.अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता

४) सणस रोड गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक

5) पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी

6) गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक

7) गावकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी

8) कोहिनूर चौक ते बाबाजान चौक

९) जेधे प्रसाद रोड, सुभानशाह रोड, शास्त्री चौक

10) सुभान शाह दर्गा