Pune Rain : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची धुंवाधार, लोणावळ्यात 115 तर वडगाव शेरी येथे 113 मिमी पावसाची नोंद


एमपीसी न्यूज – दिवसभर उकाडा व उन्हानंतर (Pune Rain) सायंकाळी पाऊस शहर परिसरात हजेरी लावत आहे. मात्र अवघ्या काही तासात पावसाचा जोर वाढत असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सखल भागात पाणी साचत आहे. रविवारी देखील पावसाने अशीच हजेरी लावली यामध्ये लोणवळा परिसरात मागील 24 तासात 115.5 मिमी पावसाची नोंद झाली तर पुण्यातील वडगावशेरी 113.5 मिमी पावसाची नोंद जाली आहे.

जोरदार पावसामुळे पुणे स्टेशन परिसरात काल पाणी साठले होते ज्यामुळे प्रवाशांचे देखील हाल झाले. सतत पावसाचे पाणी साठत असल्याने नागरिकाची गैरसोय होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे व आसपासच्या परिसरात आज व उद्या (दि.20) दुपानंतर आकाश ढगाळ राहील तसेच विजांच्या कडकडाटा सह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी घराबाहेर पडणार असाल तर पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

Kondhwa : रस्त्यावर पडलेल्या वायरचा शॉक लागल्याने 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

काल झालेल्या पावसाची नोंद मिमी मध्ये –

लोणावळा – 115.5
वडगावशेरी – 113.5
बारामती – 58.4 (Pune Rain)
कोरेगाव पार्क – 51.0
खेड – 5.05
लवळे -45.0
शिवाजीनगर – 38.2
मगरपट्टा -29.0
नारायणगाव -26.0
चिंचवड 23.0
भोर – 20.5
आंबेगाव – 20.0
एनडीए – 19.5
पुरंदर – 19.5
पाषाण – 18.2
दौंड – 12.5
माळीण -9.5
राजगुरुनगर – 3.5
गिरीवन – 3.0
हवेली -2.0
ढमढेरे -1.0