Pune Traffic Police : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना पुणे पोलिसांनी बांधली ‘सुरक्षेची राखी’


एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना प्रेमळ समज देत पुणे वाहतूक पोलिसांनी ( Pune Traffic Police ) सुरक्षेची राखी बांधली. पुणे पोलिसांनी आपल्या कृतीतून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित केले आहे.

Bhosari : शहरात भाजपची पाळेमुळे रुजविणा-या लांडगे घराण्यातील रवि मशाल घेणार हाती

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि वाहनातून प्रवास करणाऱ्या, रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी असतात. मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे दरवर्षी शहरात शेकडो नागरिकांचा हकनाक बळी जातो. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी रक्षाबंधन हा सण निवडला. पुणे वाहतूक पोलिसांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

https://x.com/PuneCityPolice/status/1825398386679255265

व्हिडीओ मध्ये एक वाहन चालक आपल्या बहिणीकडे राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी जात आहे. सिग्नलवर एक महिला वाहतूक पोलीस त्याला थांबवते आणि त्याला सुरक्षेची राखी बांधते. त्यानंतर वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन देतो. ‘दादा, तू सुरक्षित राहिलास तर तू आमची सुरक्षा करशील ना’ असा सल्ला देखील वाहतूक पोलीस महिलेने ( Pune Traffic Police ) दिला आहे.