एमपीसी न्यूज – चप्पलच्या दुकानात घुसून दुकानदाराला दमदाटी करत चप्पल व रोख रक्कम लुबाडून ( Rahatani) परिसरात गाड्यांचे तोडफोड करण्यात आली आहे ही घटना बुधवारी (दि.21) राहाटणी येथील ए वन फुटवेअर शॉप येथे घडली आहे.
याप्रकरणी ताहीर जमीन हसन (वय 46 रा. सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी शंतनु गायकवाड (वय 22) व ऋषिकेश यादव (वय 22) दोघे राहणार राहाटणी यांना अटक केली आहे.
Mahalunge : पतीने केले पत्नीवर कोयत्याने वार,पतीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे कामगार हे त्यांच्या फुटवेअर शॉपमध्ये काम करत होते. यावेळी फिर्यादींच्या ओळखीचे आरोपी हे त्यांचे दुकानात घुसले. त्यांनी फिर्यादीला दमदाटी करत दुकानातून 2 हजार रुपयांच्या चपला जबरदस्ती घेतल्या तसेच फिर्यादीच्या खिशामधून दीड हजार रुपये रोख काढून घेतले. यावेळी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार कराला तर बघून घेऊ अशी धमकी दिली. दुकानाबाहेर येऊन सिमेंटच्या गट्टू ने आसपासच्या गाड्यांची तोडफोड करत इतर दुकानदारांनाही दमदाटी करत परिसरात दहशत पसरवली. यावरून सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील ( Rahatani) तपास करत आहेत.