एमपीसी न्यूज – रावेत येथील (Ravet) इस्कॉनच्या श्री गोविंद धाम मंदिरात उद्या (रविवार) व परवा (सोमवार) असे दोन दिवस कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव रंगणार आहे. यावेळी सर्व भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ (इस्कॉन) रावेत यांनी दिली आहे.
सायंकाळी पाच ते मध्यरात्री 12 या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. यामध्ये अभिषेक, आरती, पूजन, भजन – कीर्तन व महाप्रसाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचा नागरी सत्कार
यावेळी नागरिकांना काही सेवा देखील उपलब्ध करून दिला जाणार आहेत ज्यामध्ये मंदिर सजावट सेवा, वस्त्र अलंकार सेवा, महाप्रसाद सेवा, अन्नदान सेवा, गो सेवा अभिषेक सेवा यांचा लाभ भाविकांना दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भाविकांनी 7276001836, 8975765947, 8999497816, 8308550735 या क्रमंकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.