Ravindra Bhegade : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार प्रदान, रवींद्र भेगडे मित्र परिवाराकडून यशस्वी आयोजन


एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) युवा मंचतर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सन्मानमूर्तींमध्ये  हभप डॉ. सदानंद मोरे (संत साहित्य) , रामदास काकडे (उद्योग), हभप बाळासाहेब काशीद (अध्यात्म), सूर्यकांत वाघमारे (समाजकारण),  सुरेखा जाधव (समाजकारण), रामनाथ वारिंगे (बैलगाडा क्षेत्र), सेजल विश्वनाथ मोईकर (क्रीडा) या सन्मानीय स्थानिक मावळवासीयांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले. सर्वच सन्मानार्थींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) युवा मंचाचे आभार मानले.

Alandi : महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे – साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज

याप्रसंगी रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) म्हणाले की, मावळ तालुका हा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भूमीसाठी योगदान देऊन, मावळचा नावलौकिक वाढवला. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या गौरव करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होत आहे. वरील सन्मानीय मान्यवरांच्या कर्तृत्वाने इतर जण प्रेरणा घेतील आणि मावळची घौडदौड अशीच कायम राहील.

Ravi Bhegade4

Ravi Bhegade1

Ravi Bhegade3

याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते पै.चंद्रकांतदादा सातकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपा जेष्ठ नेते निवृत्ती शेटे, भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथराव टिळे, मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, विठ्ठलराव शिंदे, माजी उपसभापती शांताराम कदम, प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे, प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड , देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र उर्फ लहुमामा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ विधानभा मतदार संघातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक व रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) युवा मंचचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Ravi Bhegade

Ravi Bhegade2