एमपीसी न्यूज – दहावी बारावीचा पुरवणी परीक्षेचा (Repeater Exam Result) निकाल शुक्रवारी (दि. 23) जाहीर झाला. दहावीचा निकाल 36.78 टक्के तर बारावीचा 32.46 टक्के निकाल लागला आहे.
दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत पार पडली. 26 जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे त्या दिवशीची परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात आली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 32 हजार 386 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 31 हजार 270 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 11 हजार 502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 36.78 टक्के आहे.
एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 हजार 255 एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एटीकेटी सवलती द्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
Nigdi : जावायाने केली सासर्याची 83 लाखांची फसवणूक
दहावी पुरवणी परीक्षेचा विभागनिहाय निकाल (Repeater Exam Result)
पुणे – 28.60 टक्के
नागपूर – 49.91 टक्के
छत्रपती संभाजीनगर – 49.94 टक्के
मुंबई – 27.76 टक्के
कोल्हापूर – 32.81 टक्के
अमरावती – 40.21 टक्के
नाशिक – 52.06 टक्के
लातूर – 50.34 टक्के
कोकण – 42.54 टक्के
इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते सहा ऑगस्ट 2024 या कालावधीत पार पडली. 26 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने या दिवशीची परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य (Repeater Exam Result) व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण 60 हजार 160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 59 हजार 200 विद्यार्थी प्रवीण परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी 19 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 32.46 टक्के आहे.
बारावी पुरवणी परीक्षेचा विभागनिहाय निकाल
पुणे – 26.57 टक्के
नागपूर – 40.54 टक्के
छत्रपती संभाजीनगर – 47.95 टक्के
मुंबई – 25.52 टक्के
कोल्हापूर – 33.47 टक्के
अमरावती – 42.59 टक्के
नाशिक – 36.86 टक्के
लातूर – 48.16 टक्के
कोकण – 25.63 टक्के