एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी(Sangvi) सांगवी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 27) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली.
Pimpri : संदीप वाघेरे युवा मंच दहीहंडीचे चेंबुरचे सद्गुरू साईनाथ गोविंदा पथक ठरले मानकरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार शिंगोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.