Sangvi : वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची सांगवी पोलिसांनी काढली धिंड


एमपीसी न्यूज – दारू पिऊन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची सराईत गुंडाने तोडफोड केली. त्या सराईत गुंडाची सोमवारी (दि. 19) दुपारी (Sangvi )पिंपळे गुरव परिसरातून सांगवी पोलिसांनी धिंड काढली.

अक्षय राजेश खुडे (वय 27, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) असे धिंड काढलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय खुडे याने शुक्रवारी (दि. 16) दुपारी रस्त्यावर पार्क केलेल्या चार वाहनांची तोडफोड केली. तसेच, “मी अक्षय खुडे आहे, मी इथला भाई आहे” असे मोठमोठ्याने ओरडून एका महिलेच्या दिशेने दगड फेकून मारला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपीला ताब्यात घेतले.

Pimpri : दिव्यांग भवन फाऊंडेशन तर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धा

आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करण्याच्या बहाण्याने आरोपीला घटनास्थळी चालवत नेले. अशा प्रकारे पोलिसांनी आरोपीची धिंड काढल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.