[ad_1]
एमपीसी न्यूज – कार मधून प्रवास करताना महिलेचे आठ तोळे सोने असलेली पर्स रस्त्यात कुठेतरी गहाळ झाली. याबाबत तिने सांगवी पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी अवघ्या 24 तासात महिलेने प्रवास केलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सोने परत मिळवून दिले.
याबाबत माहिती अशी की, 24 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता 22 वर्षीय महिला कार मधून सांगवी परिसरातून जात होती. जवळकरनगर, पिंपळे गुरव येथे महिलेने कार मधून उतरून पाण्याची बाटली घेतली आणि पुन्हा कार मध्ये बसून महिला निघून गेली. दरम्यान तिचे आठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स रस्त्यात पडली.
महिलेच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर महिलेने सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी देखील तत्परता दाखवत महिलेने ज्या मार्गावरून प्रवास केला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. जवळकरनगर येथील कल्पतरू सोसायटी जवळ पाण्याची बाटली घेताना दागिने असलेली पर्स पाडल्याचे त्यात आढळले.
PCMC : अग्निशमन विमोचक परीक्षेसाठी 27 अधिकार्यांची नियुक्ती
त्यानंतर पोलिसांनी ती पर्स कोणीतरी उचलल्याचे पाहिले आणि त्या व्यक्तीचा माग काढला. पर्स उचललेली व्यक्ती कार मधून निघून गेली होती. कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी व्यक्तीचा ठावठिकाणा शोधला आणि त्याच्याशी संपर्क केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता त्या व्यक्तीने त्याला मिळालेले दागिने परत आणून दिले. ते दागिने सांगवी पोलिसांनी संबंधित महिलेला परत केले.
[ad_2]