एमपीसी न्यूज -राज्यातील एसटी कामगारांनी दोन (ST Strike) दिवसांपासून संप पुकारला होता. आज त्यांनी तो मागे घेतला आहे. सह्याद्री अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली आहे . या बैठकीत राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारात वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे. लवकरच मुख्यमंत्री याची घोषणा करणार आहेत.
आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी संघटनांची बैठक झाली आहे. एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती. आज संपाचा दुसरा दिवस होता.त्यामुळे राज्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळाली . विशेष म्हणजे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती.
Ravindra Bhegade : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार प्रदान, रवींद्र भेगडे मित्र परिवाराकडून यशस्वी आयोजन
एसटी महामंडळातील कामगारांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली होती .ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत होते. या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज 7 वाजता एसटी संघटनांच्या बैठक प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये एसटीच्या संपावर बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून मूळ वेतनात 6,500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या सह्याद्री येथील बैठकीत घेण्यात आला आहे.