एमपीसी न्यूज – कलापिनीमध्ये नुकत्याच सानेगुरूजी कथामाला, समर्थ सेवा मंडळ आणि कलापिनी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने समर्थ रामदास स्वामी रचित ( Talegaon) मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा शालेय विद्यार्थ्याच्या 5 गटात आणि खुल्या गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेचे हे 30 वे वर्ष होते.या वर्षी विविध गटातील 300 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरणाची सुरुवात नटराजपुजनाने आणि साने गुरूजी लिखित “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने रश्मी पांढरे, दिप्ती आठवले आणि विनया मायदेव यांच्या सुरेल आवाजात करण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकात अशोक बकरे यांनी 1995 साली तळेगावात स्थापन झालेल्या साने गुरूजी कथामाला यांनी प्रथम 1995 साली सुरू केल्या व नंतर 2004 मध्ये कलापिनी सांस्कृतिक केंद्र व 2017 मधे समर्थ सेवा मंडळ यांनी पण सहकार्य करण्यास सुरुवात केली. तसेच या स्पर्धेसाठी मोरेश्वर होनप यांनी आपल्या पत्नी .मंगला होनप आणि विनया मायदेव यांनी आपल्या मातोश्री कै.शिंत्रे यांच्या स्मरणार्थ स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केल्याचे सांगितले.
Bhosari : विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना समाधान मिळते – अनिल जाधव
आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त विद्या ताई मुळे आणि अर्चना ताई मुरुगकर यांचा परिचय विनया मायदेव यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे चिंचवड चे प्रसिद्ध उद्योजक विलास बर्गे आणि पिनाकी बर्गे यांचा परिचय मोरेश्वर होनप यांनी करून दिला . नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . आपल्या मनोगतात परिक्षिका विद्याताई मुळे यांनी कमी वयात मुलांनी खूप चांगले प्रयत्न करून सुंदर सादरीकरण केले. त्या बद्दल मुलांचे कौतुक केले. अर्चना मुरुगकर यांनी मुलांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबददल शाळांचे आणि पालकांचे अभिनंदन केले ( Talegaon) तसेच सर्व मुलांचे कौतुक केले. परिक्षणाची संधी दिल्याबद्दल त्यांनी कलापिनीचे आभार मानले.
विलास बर्गे यांनी असे धार्मिक आणि सुसंस्कार विद्यार्थ्यावर करण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले .
कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी विद्यार्थ्याना आणि पालकांना हे श्लोक वर्षभर पाठ करून पुढील वर्षी पुन्हा भाग घेण्यास प्रोत्साहन दिले . तसेच मनाचे श्लोक कसे आपल्या व्यक्तिमत्वात चांगले बदल घडवून देतात हेही सांगितले. सगळ्यांनीच विविध स्पर्धेत भाग घेतल्याने व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असे सांगून स्पर्धेत भाग घेण्यास उद्युक्त केले. नंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दिपाली जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सोनाली पाडळकर व सौ. जान्हवी पावसकर यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन रश्मी पांढरे, रूपाली पाटणकर, नीता धोपाटे, ज्योती ढमाले, भाग्यश्री हरहरे, दिप्ती आठवले, किर्ती देसाई आणि दिपक जयवंत, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, किसन शिंदे, पांडुरंग देशमुख. तसेच कुमार भवन चे विद्यार्थी या सर्वानी परिश्रम घेऊन केले . तांत्रिक बाजू चेतन पंडीत यांनी ( Talegaon) सांभाळली.
मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा “
निकाल
विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव क्रमांक
गट क्र.1 शिशु गट
1. अद्वैत मंदार दामले. सरस्वती विदया मंदीर प्रथम
2. कौस्तुभ वैभव वणे. जैन इं. स्कुल व्दितीय
3. जिजा जांभुळकर. कलापिनी बालभवन तृतीय
गट क्र.2 – 1ली /2 री
1. अद्वैता विशाल कुलकर्णी. बालविकास इं. स्कूल प्रथम
2. शंतनु शौनक मुळे. बालविकास इं. स्कुल. व्दितीय
3. वेदांत दयानंद झेंडेकर. सह्याद्री इं. स्कुल. तृतीय
गटक्र3 – 3री/4 थी
1 ऋचा वैभव कुलकर्णी. पैसाफंड प्राथमिक शाळा. प्रथम
2. सुज्वल पंकज मालुंजकर पैसाफंड प्राथमिक शाळा. व्दितीय
3. ओवी राहुल वीर. सह्याद्री इंग्लिश स्कूल. तृतीय
गटक्र.4 – 5 वी ते 7 वी
1.विवान रुपनवर. हचिंग्स इंग्लिश स्कूल. प्रथम.
2. स्वरा नितीन माळी. सरस्वती विद्या मंदिर. द्वितीय.
3.आरोही अमित जव्हेरी. माऊंटसेन्ट. तृतीय.
गट क्र.5 – 8 वी ते 10 वी
1. . सोहम अभिजीत कुलकर्णी. समर्थ विद्या मंदीर..प्रथम
2. यथार्थ सुयोग शहा. पार्श्वप्रज्ञालय इं. स्कुल. व्दितीय
3. यशश्री गुणेश गोरे. समर्थ विद्या मंदीर. तृतीय.
गट क्र. 6- खूला गट
1. धनाजी रघुनाथ जाधव.प्रथम
2 . अशोक सोनाळकर. व्दितीय
3. वसुधा जोशी. तृतीय
सर्वाचे हार्दिक अभिनंदन!