एमपीसी न्यूज – पायी योगा क्लाससाठी (Talegaon) जाणाऱ्या महिलेला बसने जोरदार धडक दिली आहे. हा अपघात तळेगाव दाभाडे येथील वतन नगर येथे शनिवारी (दि.24) घडला.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अभिजीत उद्धवराव चौधरी (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी बस चालक सतीश श्रीरंग पवार (वय 48 रा. वाल्हेकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mahalunge : कंपनीमधून साडेतीन लाख रुपयांचे धातूचे तुकडे चोरणाऱ्या कामगारांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई घरातून आवरून पायी योगा क्लाससाठी (Talegaon) वडगाव फाटा ते चाकण रोडने वतन नगर येथे जात होत्या. यावेळी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस वेगाने चालवून फिर्यादी यांच्या आईला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या 64 वर्षीय आई या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.