Talegaon : श्रीरंग कलानिकेतन मध्ये सुश्राव्य गीतांची सुमधून मैफिल


एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतनच्या(Talegaon) वतीने आयोजित केलेल्या गीतांच्या सुमधूर मैफिलीत तळेगावकर सुश्राव्य सुरांनी न्हाऊन निघाले. व्हर्सा कंट्रोल्सच्या सौजन्याने आयोजित केलेल्या या मैफिलीत उपस्थितांना पावसाच्या मराठी व हिंदी गीतांची मेजवानी मिळाली.

व्हर्सा कंट्रोल्सचे सर्वेसर्वा व श्रीरंग कलानिकेतनचे विश्वस्त उद्धव चितळे, संगीत अभ्यासिका निशा अभ्यंकर, विश्वास देशपांडे, दिपक आपटे, विनय कशेळकर आणि राजीव कुमठेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मैफिल सुरु झाली. सावनी परगी-खाडिलकर, धनश्री शिंदे, सम्राट काशीकर, राजीव कुमठेकर, लीना परगी, अक्षरा काशीकर, मीरा भरड यांनी एकाहून एक सरस गीते सादर करत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

Untitled design 2024 08 28T174800.224

Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक

अक्षरा काशीकर या चिमुरड्या गायिकेने सादर केलेल्या गीताला प्रेक्षकांकडून कडकडून टाळ्या मिळाल्या. सर्व गायिकांनी एकत्र येऊन सादर केलेल्या ‘गरजत बरसत सावन आयो रे…..’ हे गीत रसिकांना भावलं. बरसणाऱ्या मेघांच्या संगतीने एकापेक्षा एक सुंदर गाण्यांची बरसात रसिकांना सुखावणारी होती. श्रीरंगचे विश्वस्त उद्धव चितळे आणि सचिव विनय कशेळकर यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला.

DSC 3541 1

डॉ. विनया केसकर यांनी निवेदन केले. साथ संगत प्रदीप जोशी (संवादिनी), मंदार परगी, अनिरुद्ध जोशी (तबला), प्रवीण ढवळे (तालवाद्य,ओक्टोपॅड), गंधार ढवळे (तालवाद्य) आणि राजेश झिरपे (सिन्थ) यांनी केली. कार्यक्रमाची संकल्पना राजीव कुमठेकर यांची होती. ध्वनी संयोजन केदार अभ्यंकर यांनी केले. छायाचित्रण श्रीकांत चेपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनय कशेळकर, दिपक आपटे, राजीव कुमठेकर आणि विश्वास देशपांडे यांनी परिश्रम घेतले.