Talegaon : रसिकांनी अनुभवला गुलजार एक कलाप्रवास 


एमपीसी न्यूज – प्रसिद्ध कवि, गीतकार, लेखन ,दिग्दर्शन , शाहिरी अशा साहित्याच्या विवीध पैलूंतून लिलया प्रवास कराणाऱ्या गुलजार (Gulzar) यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा, प्रेक्षकांना भारावून टाकणारा ऑडिओ, व्हिज्युअल कार्यक्रम कलापिनीच्या (Talegaon) कै. डॉ शं वा. नाट्य संकुलातील अवकाश रंगमंचात पार पडला. कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन… हे गाण्याचे स्वर सुरु झाले आणि पुढील दीड तास या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पडदयावर दिसणारी गुलजारजींची वेगवगळी गाणी, काही चित्रपटातील दृश्य, शेरोशायरी आणि डॉ. अनंत परांजपे यांचे उत्कृष्ट भावपूर्ण निवेदन, ह्यांच्या एकत्रित सादरीकरणाने कार्यक्रमाची एक वेगळीच उंची गाठली गेली.

सिनेमा कसा बघावा आणि दिग्दर्शकाने नायक, नायिकेच्या भावना समजून घेऊन कसे दिग्दर्शन केले आहे, हे डॉक्टरांनी उत्तमप्रकारे समजावून सांगितले.

आशिर्वाद चित्रपटातील दृश्य दाखवून,  मुलांच्या पाठिशी पालकांनी कसे खंबीरपणे उभे राहीले पाहिजे, हा अर्थपूर्ण संदेश डॉक्टरांनी दिला.

MP Shrirang Barne :  सिडको हद्दीतील समस्या सोडवा – खासदार श्रीरंग बारणे

मेरे अपने, परिचय, किनारा, आँधी, इजाजत, लेकिन, माचिस ह्या गुलजारजींच्या (Gulzar) चित्रपटांना पाहण्याची वेगळीच दृष्टी डॉक्टरांनी प्रेक्षकांना दिली. हमको मन की शक्ती देना, इक था बचपन, इस मोड पे जाते है, जिंदगी कैसी है पहेली  अशा गाण्यांची अविट गोडी प्रेक्षकांना चाखायला मिळाली.

 कलापिनी फिल्म क्लब चा उद्घाटनाचा हाच कार्यक्रम होता दहा वर्षांपूर्वी त्यानंतर पुणे, मुंबई, बदलापूर, बेळगाव, लंडन, ग्लास गो अटलांटा अशी ती ह्याच आणि प्रदेशात याचे कार्यक्रम झाले गेले आहेत.

डॉ. स्वाती वेदक यांच्या हस्ते डॉ. अनंत परांजपे आणि कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या विराज सवाई, हिमांशू चौधरी, संदीप मनवरे, आशुतोष परांजपे यांचा सत्कार  करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे डिजीटल पोस्टर बनविण्याचे काम चैतन्य जोशी याने केले गुलजारजींनी जरी त्यांच्या चित्रपटांमध्ये फ्लॅशबॅक या तंत्राचा वापर केला असला तरीही डॉ. अनंत परांजपे यांनी सुद्धा प्रेक्षकांना त्यांच्या निवेदनातून फ्लॅशबॅक मध्ये नेले, असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा पोंक्षे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी कलापिनीचे उपाध्यक्ष अशोक बकरे, राजन पाटणकर हे उपस्थित होते. कलापिनीचे (Talegaon) कार्यकर्ते दिपाली जोशी, रश्मी पांढरे, नीता धोपाटे,  रामचंद्र रानडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

गुलजारजींचा वाढदिवस असल्याने केक आणि चहा पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.