Talegaon Dabhade:मेंबरशिप सेमिनार मध्ये रोटरी सिटीला सहा पारितोषिके


एमपीसी न्यूज-रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी क्लबला क्लब फॉरमेशन,पाच वर्ष मेंबरशिप ग्रोथ, (Talegaon Dabhade)लेडी रोटरियन मेंबर,पार्टनर कन्हवरटेड, घर वापसी आणि अँप्रिसियेट अशी एकूण सहा पारितोषिके मिळाली. सहा पारितोषिके पटकावून मेंबरशिप सेमिनार तळेगाव सिटीने आपला जोरदार डंका वाजवला. यामुळे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डिस्ट्रिक्ट 3131 चे रविवार दि 25 ऑगस्ट 2024 रोजी बंटारा भवन, बाणेर येथे झालेल्या मेंबरशिप सेमिनार मध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने 6 पारितोषिके पटकावून मेंबरशिप सेमिनार मध्ये आपला जोरदार डंका वाजवला व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवला.

रोटरी सिटी क्लबला क्लब फॉरमेशन,5 वर्ष मेंबरशिप ग्रोथ,लेडी रोटरियन मेंबर ,पार्टनर कन्हवरटेड,घर वापसी आणि अँप्रिसियेट असे एकूण सहा पारितोषिके मिळाली.DG रो शितल शहा,मेंबरशिप चेअर PDG रो पंकज शहा,DGN रो.नितीन ढमाले,AG रो.अजित वाळुंज तसेच डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो.जिग्नेश पंड्या आणि सर्व डिस्ट्रिक्ट सदस्य या सर्वांच्या उपस्थित मध्ये दिमाखदार सोहळ्यात रोटरी सिटी क्लबचे अध्यक्ष रो किरण ओसवाल व सदस्य यांना सन्मानित करण्यात आले.

Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार

रोटरी सिटीचे सदस्य सह प्रांतपाल रोटरियन दीपक फल्ले यांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.रोटरी सिटीचे अध्यक्ष रो किरण ओसवाल मेंबरशिप डायरेक्टर रो प्रशांत ताये,क्लब एडमिन रो संतोष परदेशी व संचालक व रो बसप्पा भंडारी हे सर्वजण उपस्थित होते.

रोटरी सिटीचे सहप्रांतपाल दीपक फल्ले,मेंबरशिप डायरेक्टर प्रशांत ताये,क्लब एडमिन संतोष परदेशी व सर्व सदस्यांनी मला मनापासून साथ दिली तसेच नवीन सदस्य त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ व सदस्य यांचे आभार मानतो असे प्रतिपादन अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले.

घर वापसीमध्ये रो मिलिंद निकम, संतोष लोणकर,वैभव पाचपोर, बाळासाहेब रिकामे, नवीन सदस्य म्हणून नीलेश राक्षे,दिनेश चिखले, रमेश अबनावे,विकी बेल्हेकर,सुरेश थोरात,डॉ रोहित अगरवाल तर महिला सदस्य अनिता ओसवाल व अनघा कुलकर्णी या नवीन सदस्यांमुळे आम्ही मेंबरशिप सेमिनार मध्ये भरीव पारितोषिके प्रदान करू शकलो.

सर्व नवीन सदस्य यांचे अध्यक्ष किरण ओसवाल व मेंबरशिप डायरेक्टर प्रशांत ताये यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.