Talegaon Dabhade : डॉ. सागर शिंदे यांना उत्कृष्ठ विभागप्रमुख पुरस्कार प्रदान


एमपीसी न्यूज- भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (Talegaon Dabhade) द्वारा प्रमाणित, इन्स्टिटयूट ऑफ स्कॉलर्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाकडून घेण्यात आलेल्या नामांकनांपैकी यंदाचा उत्कृष्ठ विभागप्रमुख पुरस्कार, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – आर्टीफिसिअल इंटेलिजन्स या विभागाचे विभागप्रमुख डॉ. सागर भिलाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार हा नेतृत्व गुण, व्यवस्थापन, निकालाची टक्केवारी, विद्यार्थ्यांचा अभिप्राय व संशोधन उत्कृष्टता ह्या सर्व निकषांच्या उत्तम दर्जासाठी दिला जातो. या सर्व निक्षणावर आधारित हा पुरस्कार डॉ. शिंदे यांना प्राप्त झाला आहे.

Pune: शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

संस्थेचे अध्यक्ष मा. संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार, तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेशजी म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई , सी ई ओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी (Talegaon Dabhade) शिंदे यांच्या उत्तुंग यशाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच या पुरस्कारासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अमोल सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.