Talegaon Dabhade : पथविक्रेत्यांच्या समिती सदस्यांची निवडणूक जाहीर


एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रातील पथविक्रेत्यांच्या समिती सदस्यांची निवडणूक नगर परिषदेने जाहीर केली आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी ही ( Talegaon Dabhade ) निवडणूक घेण्यात येणार आहे. 

या निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डॉ कैलास चव्हाण तर सहाय्यक म्हणून  कल्याणी लाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

Pune : पुणे फेस्टिवल 13 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पथविक्रेत्या सदस्यांची 693  एवढी संख्या असून त्यांची अधिकृत नोंदणी झालेली आहे. ही यादी नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली आहे. निवडणूक कार्यक्रमांनुसार नाम निर्देशन पत्राचे वाटप करणे व नामनिर्देशन पत्र स्वीकारणे हे दि .5 सप्टेंबर पर्यंत होणार आहे. नामनिर्देशक पत्राची छाननी ही दि. 6 सप्टेंबर रोजी होणार असून नामनिर्देशन पत्र माघार घेण्यासाठी 9 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. तर त्याच दिवशी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे व 18 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होऊन सायंकाळी पाच वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून लगेचच निर्णय जाहीर करण्यात ( Talegaon Dabhade ) येणार आहे.