एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील विन्यासा योग वर्गामध्ये उत्साहात अनेक विविध गुणांनी नटलेला (Talegaon Dabhade) असा श्रावणी खेळांचा कार्यक्रम सादर झाला.
प्रत्येक योग गटातील महिलांनी त्यात सहभाग घेतला होता. जोगवा, भांगडा, मंगळागौर, रिमिक्स लावणी, सोलो डान्स गवळण सादर केली. तसेच महिलांनी, मुलींनी कसे सतर्क रहावे याविषयी वर्षा जव्हेरी यांनी मार्गदर्शन केले.
दुग्ध शर्करा योग म्हणजे तळेगावातील श्रावणी ग्रुपने छान छान गाणी सादर करून कार्यक्रमाला शोभा आणली आणि आरती कुलकर्णी हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
Alandi: श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं मंदिरात दूध वाटप
विन्यासा योग गट हा गेले दोन वर्षापासून तळेगावमध्ये नावजला जात आहे. तसेच या योग वर्गात नुसता योग न होता, वेगवेगळे पारंपारिक सण-उत्सव पण तेवढ्याच उत्साहात सगळे मिळून साजरे करतात. या वर्गाची स्थापना योगशिक्षिका सीमा इनामदार यांनी केली असून अनेक महिला त्यांच्याकडे योग प्रशिक्षणासाठी (Talegaon Dabhade) येतात.