Talegaon Dabhade: रोटरी चॅलेंजर्सचे स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन


एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील विद्यार्थ्यांसोबत (Talegaon Dabhade)रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रोटरी चॅलेंजर्सच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांच्या सोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलात महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील शेतमजूर, विट कामगार, आदिवासी, कामगार अशा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलांचं मोफत संगोपन केलं जातं. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी जिज्ञासा यांच्या जोरावर खूप अभ्यास करून आपल्या परिस्थितीवर मात करावी व खूप मोठे व्हावे असे प्रतिपादन रोटरी चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी करताना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना भारतीय सण आणि उत्सव यांची पौराणिक व ऐतिहासिक माहिती सांगून त्यांच्यात सांस्कृतिक वारसा रोटरी सारख्या संस्था निर्माण करतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील आगळे यांनी प्रतिपादन केले.

Pune :वैज्ञानिक दृष्टिकोन हा डॉ. अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार;आदरांजली सभेत आठवणींना उजाळा

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे गुरुकुलाची माहिती प्रदीप टेकवडे यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रकल्प प्रमुख उमा काशीकर सहप्रकल्प प्रमुख संगीता शिळीमकर यांनी केले. मान्यवर पाहुण्यांना चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर प्रसंगी तळेगाव येथील करंडे क्लासेसच्या वतीने गुरुकुलास आरोग्यविषयक साहित्य स्वरूपात मदत करण्यात आली.

लक्ष्मण पुजारी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघा) मुग्धा जोगळेकर,वृषाली करंडे,महेश दुधाने, करुणांजली मतिमंद शाळेच्या सिस्टर  जया मेकवान, ओलिविया फर्नांडिस  उद्योजक भारत राजिवडे, दादा शिरोडकर इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार मनोज जैन यांनी मानले गुरुकुलचे विद्यार्थी, करंडे क्लासेसचे विद्यार्थी, करुणांजली मतिमंद शाळेच्या विद्यार्थिनी, रोटरी चॅलेंजर्सचे सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते.