[ad_1]
एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेल्या मॅफेड्रोनसह एका तरुणाला पोलिसांनी (Talegaon Dabhade) अटक केली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 2) रात्री नऊ वाजताच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे ही कारवाई केली.
संजीत उर्फ वेपन विजेद्र यादव (वय 22, रा. जाधववस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Kundmala : कुंडमळ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला; तरुणीसाठी दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथे एकजण येणार असून त्याच्याकडे अंमली पदार्थ आहेत, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 लाख 25 हजार 500 रुपयांचे 22.55 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली 65 हजार रुपयांची दुचाकी व एक ॲपल कंपनीचा मोबाइल असा एकूण तीन लाख 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याने मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ नालासोपारा, मुंबई येथील त्याचा मित्र इमरान याच्याकडून आणल्याचे सांगितले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास (Talegaon Dabhade) करीत आहेत.
[ad_2]