
Tips for teaching baby good things in womb in marathi
गर्भ संस्कार म्हणजे बाळ पोटात असताना आपण त्याला जे संस्कार देतो ते म्हणजे गर्भ संस्कार. गर्भ संस्कारामुळे बाळ शांत आणि बौद्धिक दृष्टया लवकर विकसित होते असं मानतात.
आई आणि मुलाचं नातं दृढ होतं आणि पोटात असल्यापासून ते आपल्या आई बाबांना ओळखायलाही लागतं.
ह्यावरून गर्भ संस्कार हे आपल्याकडे फार पूर्वी पासून रुजलेले आहेत ही गोष्ट लक्षात येते.
Also Read: पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी
पण हे गर्भ संस्कार करावे कसे??
- स्तोत्र :आपल्याकडे बऱ्याच बायका देवाची स्तोत्र म्हणावंयास सांगतात
- वाचन :गरोदर स्त्री जे काही वाचन करते त्यातून देखील गर्भ संस्कार होतात
- बोलणे :बाळ गर्भात वाढत असताना आपण त्याच्याशी जे काही बोलतो त्यातून देखील त्याच्यावर गर्भात संस्कार होत असतात.
- संगीत :संगीत हे देखील बाळावर संस्कार करण्याचे उत्तम साधन आहे.
लक्षात ठेवा आईची गरोदर असतानाची मानसिक स्थिती देखील गर्भावर होणाऱ्या संस्कारांची चाहूल देत असते. त्यामुळे गर्भवतीने आनंदी आणि प्रसन्न राहणे अतिशय गरजेचे आहे.

मग गरोदर असताना मानसिक स्वास्थ कसं जपाल??हे मी माझ्या आईपण नावाच्या blog मध्ये सांगितलं आहे.
पुढे हेच गर्भ संस्कार आईच्या दुधातून होतं राहतात तेव्हा बाळ अंगावर असताना देखील आईने मन प्रसन्न ठेवणं खूप गरजेचे आहे. तेव्हा बाळंतपणात मानसिक स्वास्थ्य कसं जपाल?? हे देखील वाचा.
लक्षात ठेवा जेवढी आई आनंदी तेवढी बाळ सुदृढ आणि निरोगी. तेव्हा वेळ घालवू नका गर्भ संस्कारास सुरुवात करा 🙂
(This article is written by a mother of a cute baby boy Mrs. Nikita Vaidya Kotnis Parenting Blogger)