Today’s Horoscope 06 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य


एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 06 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार

तारीख – 06.09.2024.

शुभाशुभ विचार- शुभ  दिवस.

आज विशेष- हरितालिका तृतीया.

राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र- हस्त 09.25 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या 23.01 पर्यंत नंतर तूळ. 

—————————-

मेष  (शुभ रंग- गुलाबी)

काही किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐन वेळेस काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)

कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा तुम्ही खर्च करू शकाल.

मिथुन (शुभ रंग – मरून)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. आज वास्तु व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध  जुळतील. वाणीत मात्र गोडवा गरजेचा आहे.

सिंह ( शुभ रंग- हिरवा)

तुमची आर्थिक आवक आज मनाजोगती असेल. काही प्रिय पाहुण्याचे घरी आगमन होईल. वाणिज गोडवा ठेवला तर अनेक कामे सोपी होतील प्रवासात थोडा त्रास होईल.

कन्या (शुभ रंग- पांढरा)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असून सर्व कामे विना व्यत्यय पार पाडू शकतील. आज उपवरांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.  विरोधक आज नमतेच घेतील.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईलच, पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षितपणे दुरचे प्रवास घडणार आहेत.

वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल की पूर्व कराल.

धनु (शुभ रंग- पिस्ता) 

उच्च अधिकारी वर्गाला अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

मकर (शुभ रंग- क्रीम)

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा, संयम ठेवा.

मीन (शुभ रंग- मोतिया)

भागीदारी तत्त्वावर एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदारही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424