Today’s Horoscope 07 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य


एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 07 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार

तारीख – 07.09.2024.

शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.

आज विशेष- श्री. गणेश चतुर्थी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र- चित्रा 12.34पर्यंत नंतर स्वाती.
चंद्र राशी – तूळ.
—————————-
मेष- (शुभ रंग- राखाडी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. धंद्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घ्या.

वृषभ (शुभ रंग- मरून)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद संध्याकाळी निवळतील.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. आज हीतशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत. सतर्क रहा.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही आज ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण असावे.

कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

तूळ (शुभ रंग- मोरपंखी)
आज कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल नोकरदार मंडळी वरिष्ठांचा विश्वास संपादन करतील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. येणी असतील तर वसूल होतील.

वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
कोणत्याही आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर आज दुसऱ्याला आश्वासन देऊ नका. दानधर्म करताना सुद्धा आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

धनु (शुभ रंग- सोनेरी)
नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम मोडू नका.

मकर (शुभ रंग- पिस्ता)
नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ला देणार आहेत. सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.

मीन (शुभ रंग- आकाशी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424