एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 11 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
वार – बुधवार.
आजचा दिवस – आनंदी दिवस.
तारीख – 11.09.2024.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- गौरी पूजन, दुर्गाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र-ज्येष्ठा 21.22 पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक 21.22 पर्यंत नंतर धनु.
—————————-
मेष (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. व्यवसायात स्पर्धक वरचढ ठरण्याची शक्यता आहे. आपले भावी प्लॅन्स गुप्त ठेवा. आज कोणतेही धाडस करू नका.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. जोडीदाराला पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन (शुभ रंग – आकाशी)
धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणे अंगावर काढू नका. आज विश्रांती ही गरजेची आहे.
कर्क ( शुभ रंग- हिरवा)
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.
सिंह ( शुभ रंग- चंदेरी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदराला पात्र होतील. आज तुम्ही गरजूंना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येतील.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणावरून शेजारी रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणाला आवर घालायला हवा, कारण त्यामुळे नाती दुरावतील.
तूळ (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. कोणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. उतावीळपणाने घेतलेले काही निर्णय चुकतील. आज तुमच्याकडे विविध मार्गाने पैसा येईल.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज एखादी हरवलेली वस्तू गवसेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरा मोठ्यांच्या होला हो करा पण वाद वाढवू नका.
धनु (शुभ रंग- मोरपंखी)
महत्त्वाच्या कामासाठी वणवण भटकावे लागेल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गाला विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावणार आहात.
मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.
कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. रिकामटेकडा मित्रांना उद्याची वेळ दिलेली बरी. व्यस्त दिवस.
मीन (शुभ रंग- केशरी)
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिकही देवाला एखाद्या नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची तुम्हाला साथ राहील.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424