एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 12 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – गुरुवार.
तारीख – 12.09.2024.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- गौरी विसर्जन.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 03.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- मूळ 21.53 पर्यंत, नंतर पूर्वाशाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————-
मेष (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रातील काही किरकोळ अडचणी सहजच सुटतील.
वृषभ (शुभ रंग- हिरवा)
आज भागीदारी व्यवसायात काही मतभेद होऊ शकतात. देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे. मित्रांच्या नादी लागून जे मनाला पटत नाही ते करू नका, संयम बाळगा.
मिथुन (शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवींचा सल्ला जरूर घ्या. घरगुती निर्णय घेतानाही जोडीदाराचे मत अवश्य घ्या. संध्याकाळी एखाद्या समारंभात तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्याल.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरीही तुमच्या कामातील उत्साह दंड असेल. आज तुमच्या प्रयत्नांना दैवही अनुकूल राहील. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी.
सिंह ( शुभ रंग- पांढरा)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. काही रसिक मंडळी इतर आज कामावर दांडी मारूनही करमणुकीला प्राधान्य देतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
आज परिवारात सामंजस्याचे वातावरण असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. वडीलधाऱ्यांना अभिमान वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.
तूळ (शुभ रंग- चंदेरी)
सामाजिक कार्य करणाऱ्यांचा मानसन्मान वाढेल. आज फार बडबड टाळा अन्यथा तुमचीच काही गुपिते उघड होतील, सतर्क रहा. गृहिणीनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या धनस्थानातून चंद्रग्रहण होत असताना काही अनपेक्षित धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात भाग्योदयाकडे वाटचाल कराल. शब्द मात्र जपून वापरा.
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
स्वराशीतून होणारे चंद्रभ्रमण तुमच्या मनाची चंचलता वाढवेल. महत्त्वाचे निर्णय घेताना आज द्विधा मनस्थिती होईल. आज काम कमी व धावपळच जास्त होणार आहे.
मकर (शुभ रंग- मोरपंखी)
पैसा येण्याआधीच तो जाण्याचेही मार्ग तयार असतील. चैनी वृत्तीला लगाम घालून आज तुम्ही भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्याल.
कुंभ ( शुभ रंग- केशरी)
पैशाअभावी रखडलेले तुमचे काही जुने उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आज मित्रमंडळीत तुम्हाला मानाची वागणूक मिळेल. अनपेक्षित लाभ मनाला आनंद देतील.
मीन (शुभ रंग- डाळिंबी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. अधिकारात वाढ होईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येईल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424