Today’s Horoscope 16 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

[ad_1]

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 16 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 16.09.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- ईद- ई मिलाद.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेला असेल.

आज नक्षत्र- धनिष्ठा 16.33 पर्यंत, नंतर शतकारका.

चंद्र राशी – कुंभ. 

—————————-

मेष (शुभ रंग- क्रीम)

आज कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून जसे चिंताल तसे होईल. शुभच चिंता.

वृषभ (शुभ रंग- भगवा)

कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)

घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल. आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल.

कर्क ( शुभ रंग- गुलाबी)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा, आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

सिंह ( शुभ रंग- हिरवा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज तुम्हाला जोडीदाराची खंबीर साथ राहील.

कन्या (शुभ रंग- भगवा)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

तूळ (शुभ रंग- मोरपंखी)

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृहिणीना मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे. सौंदर्य प्रसाधनांशी निगडित व्यवसाय चांगले चालतील.

धनु (शुभ रंग- केशरी) 

शेजाऱ्यांशी किरकोळ कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन एकोपा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर वाद टाळावेत.

मकर (शुभ रंग- डाळिंबी)

खर्च कितीही वाढला तरीही पैसा कमी पडणार नाही. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाड. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. सुसंवाद साधाल.

कुंभ ( शुभ रंग- राखाडी)

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. कठोर बोलण्याने नाती दुरावतील.

मीन (शुभ रंग- लाल)

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज गरजेपुरते आध्यात्मिक व्हाल. आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

ReplyForwardAdd reaction



[ad_2]