Today’s Horoscope 19 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य


जचे पंचांग (Today’s Horoscope 19 August 2024)
आजचा दिवस – सोमवार.
तारीख – 19.08.2024.
शुभाशुभ विचार- 14 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.
राहू काळ – 7.30 ते 9.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- श्रवण 08.10  पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी- मकर 19.00 पर्यंत नंतर कुंभ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- पांढरा)
आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकू शकतात. हाती असलेला पैसा जपून वापरा. मित्रांच्या नादी लागू नका. कर्तव्यास प्राधान्य द्या.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

मिथुन (शुभ रंग – आकाशी)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील.

कर्क ( शुभ रंग- हिरवा) Today’s Horoscope 19 August 2024
केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे.

सिंह ( शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्दांचा वापर जपूनच करा.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
दुकानदारांची उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळतच रमतील.

Pune : अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

धनु (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मकर (शुभ रंग- डाळिंबी)
आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नात्यात गैरसमज होतील. कोणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, सतर्क रहा.

मीन (शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही होईल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424