एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 20 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – मंगळवार.
तारीख – 20-08-2024.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – 03 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- शततारका.
चंद्र राशी- कुंभ.
—————————–
मेष ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. जसे चिंताल तसेच होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.
मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील.
कर्क ( शुभ रंग- पांढरा)
आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे धावणे योग्य ठरणार नाही. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आज ताकही फुंकून प्यावे.
सिंह ( शुभ रंग- राखाडी)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही घराबाहेर ही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.
वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.
धनु (शुभ रंग- भगवा)
शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणांनी झालेले गैरसमज दूर होऊन जवळीक वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर क्रोधावर लगाम असावा.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
आज आवक भक्कम असल्याने वाढत्या खर्चातही कपात करण्याची गरज भासणार नाही. प्रिय पाहुणे आज घरी पाय धुळ झाडतील. नेतेमंडळी आज सभा गाजवतील.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
आज तुम्ही अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. महत्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. उपवर मंडळींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.
मीन (शुभ रंग- सोनेरी)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी होईल. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424