Today’s Horoscope 24 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य


एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 24 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

K D Sonigara Jewellers

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 24.08.2024.

शुभाशुभ विचार- क्षय तिथी.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र- अश्विनी 18.06  पर्यंत नंतर भरणी.

चंद्र राशी- मेष.

—————————–

मेष (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. आज इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा असेल.

कर्क ( शुभ रंग- मरून)

नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गाला अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची आज तुमची तयारी असेल.

सिंह ( शुभ रंग- गुलाबी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कन्या (शुभ रंग- जांभळा)

फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडी च्या वेगावर नियंत्रण ठेवा.

तूळ (शुभ रंग- पिस्ता)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

धनु (शुभ रंग- लाल) 

आज मौज मस्ती करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. आज कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मकर (शुभ रंग- मोरपंखी)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादाला आमंत्रण देईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

मीन (शुभ रंग- केशरी) 

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424