आजचे पंचांग (Today’s Horoscope 26 August 2024)
आजचा दिवस – सोमवार.
तारीख – 26.08.2024
शुभाशुभ विचार-16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- कृत्तिका 15.55 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी- वृषभ.
—————————–
मेष- (शुभ रंग- केशरी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची परिस्थिती उत्तम असेल त्यामुळे मनस्थिती ही उत्तम असेल. आज एखाद्या गरजवंतास मदतीचा हात द्याल. सामान्य दिवस.
वृषभ (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. आज एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
आज काही जणांना तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. पासपोर्ट विजा विषयक रखडलेली कामे गती घेतील. वृद्ध मंडळी तीर्थक्षेत्री पर्यटन करतील.
Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे – मुरलीधर मोहोळ
कर्क ( शुभ रंग- क्रीम)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असून दिवसाच्या पूर्वार्धातच एखादा लाभ संभवतो. एखाद्या समारंभात आज तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्याल. अति बडबड मात्र टाळा.
सिंह ( शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात काही नव्या संधी चालून येणार आहेत. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रिकामटेकड्या मित्रांना दोन हात दुरच ठेवणे हिताचे.
कन्या (शुभ रंग- मोतिया)
राशीच्या भाग्यातून होणारे चंद्रभ्रमण तुम्हाला अध्यात्म या विषयाची गोडी निर्माण करेल. आज तुम्ही यथाशक्ती काही दानधर्म कराल. घरात एखादे देव कार्य करून घ्याल.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्ही आपल्या मर्यादेत राहणे गरजेचे आहे. कुठेही फार आक्रमक होऊ नका. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेले बरे. घरात जोडीदाराशी सुसंवाद साधावा.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कोणतेही नवे उपक्रम उत्साहाने सुरू करू शकाल. वेळेचे योग्य नियोजन करू शकाल. वैवाहिक जीवनात ही गोडी गुलाबी राहील.
धनु (शुभ रंग- मोरपंखी )
आज महत्त्वकांक्षांना थोडासा ब्रेक लावून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही जुनी दुखणे डोके वर काढण्याच्या विचारात आहेत वेळीच लक्ष द्या.
मकर (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. तरुणांच्यात आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कामाच्या व्यापात बराच काळ रखडलेल्या घरगुती कामात लक्ष घालाल. गृहिणींना मुलांच्याही अभ्यासात डोकवावे लागेल. तरुणांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.
मीन (शुभ रंग- पांढरा)
आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाणार आहे. काही मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424