Today’s Horoscope 28 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य


आजचे पंचांग (Today’s Horoscope 28 August 2024 )
आजचा दिवस – बुधवार.
तारीख – 28.08.2024
शुभाशुभ विचार- 13 प.चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- मृग 15.53 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी- मिथुन.
—————————–
मेष- (शुभ रंग- क्रीम)
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता जास्त आहे. मित्रांच्या नादी लागून जे पटत नाही ते करायला जाऊ नका. प्रवासात नवे हितसंबंध जुळतील.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)
आज खिशात पैसा खेळता राहील. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील काही नाती जपायची असतील तर आज जरा अतिस्पष्टवक्तेपणा ला आवर घाला.

मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज काही मनाजोगत्या घटना तुमचा कामातील उत्साह वाढवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्ही एखादा विवाह संबंध जुळवण्यात मध्यस्थी कराल.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
आजचा दिवस खर्चाचा. आज तुम्हाला काटकसर करणे जमणार नाही. मनसोक्त खर्च कराल. जेष्ठांची अध्यात्माकडे ऋषी वाढेल. तरुणांच्या अंगी बेफिकिर वृत्ती वाढणार आहे.

सिंह ( शुभ रंग- राखाडी)
आजचा तुमचा कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. आज तुमच्यासाठी यशोदा ही दिवस असून एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

कन्या (शुभ रंग- गुलाबी) Today’s Horoscope 28 August 2024 
नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे दडपण राहील. आज बिनचूक कामाला प्राधान्य द्यावे. व्यावसायिक मंडळी वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

तूळ (शुभ रंग- भगवा)
सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. श्रद्धाळू गृहिणींचा देवधर्म चालूच राहील. अध्यात्मिक मार्गात असलेल्या मंडळींना एखादी दिव्य प्रचिती येईल.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घरात जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे राहील.

धनु (शुभ रंग- चंदेरी )
आज मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

मकर (शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्री गतिमान ठेवता येतील. आज कोणालाच काही सल्ले न देता स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य देणे हिताचे राहील.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. एखादा नवीन विषय आत्मसात करण्याकडे आज तुमचा कल राहील.

मीन (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील नवोदितांना प्रयत्न वाढवावे लागतील.

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424