Home Marathi आज प्रख्यात लेखक #वपुकाळे यांचा जन्मदिन.

आज प्रख्यात लेखक #वपुकाळे यांचा जन्मदिन.

14
0

आज प्रख्यात लेखक #वपुकाळे यांचा जन्मदिन. जन्म.२५ मार्च १९३३


लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे हे पेशाने वास्तुविशारद होते. कथा,ललित लिखाण, नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक व पुं चे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद …


आणि जाता जाता जीवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी. पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्याज काही मोजक्या लेखकांमध्ये वपुंचा समावेश होतो हे नक्की “वपुर्झा” हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!

आज प्रख्यात लेखक #वपुकाळे यांचा जन्मदिन.


वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात.

त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत.

अवतीभोवती असणार्याा लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे. “आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच “तप्तपदी”, “ठिकरी”, “पार्टनर”, “ही वाट एकटीची” यासारख्या कादंबरी खुपच गाजल्या; व.पु काळेंना “महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान”, “पु.भा.भावे पुरस्कार”, “फाय फाउंडेशनाचा पुरस्कार” आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. व.पु काळे यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले.

Previous articleTop ten anime girl
Next articleHow to Solve the Large Cave Shrine Puzzle in Resident Evil 4 Remake