[ad_1]
एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या (Vanraj Andekar ) खून प्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. गणपती उत्सवाच्या काळात पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले होते. सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी हे फरार होते. त्यांना कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा युनिट एक गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी कक्षाने त्यांना पकडले. आरोपींकडून आठ पिस्तूल, 13 काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे.
वनराज आंदेकर ( Vanraj Andekar) यांची रविवारी पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. दहा ते पंधरा जणांच्या टोक्याने त्यांच्यावर हल्ला केला. बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
यामध्ये काही अल्पवयीन मुलांना ही ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या मध्ये वनराज आंदेकर याची सखी बहिण, बहिणीचा नवरा, नातेवाईक आणि इतर आरोपी आहे. मात्र यातील प्रमुख आरोपी आहे सोम्या उर्फ सोमनाथ गायकवाड. त्याला देखील पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
[ad_2]