एमपीसी न्यूज – पेविंग ब्लॉकने मारून व्यक्तीचा खून (Wakad)केल्याची घटना सोमवारी (दि. 9) सकाळी धनगर बाबा मंदिरा जवळ थेरगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अली अन्सारी (वय 35) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी श्वेता घोरपडे/ शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक बीआरटी रोड धनगर बाबा मंदिरा जवळ सोमवारी सकाळी अली अन्सारी याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पेवींग ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.