[ad_1]
एमपीसी न्यूज – नीरा खोऱ्यातील चार (Water Discharge News)धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी आणि वीर या चार धरणांमधून सुमारे 39 हजार विसर्ग केला जात आहे. तसेच खडकवासला धरणातून देखील 35 हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे.
मागील दोन दिवसांपासून मान्सून परतला आहे. शनिवारी (दि. 24) आणि रविवारी (दि. 25) हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जरी केला आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. जुलै महिन्यात भरलेल्या धरणांमध्ये पुन्हा पाण्याचा युवा सुरू झाला आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
Pune : दहीहंडी उत्सवानिमीत्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
नीरा खोऱ्यातील भाटघर धरणातून 9 हजार 331 क्युसेक, नीरा देवधर धरणातून 5105 क्युसेक, गुंजवणी धरणातून 733 क्युसेक तर वीर धरणातून 24 हजार 535 क्युसेक विसर्ग केला जात आहे.
त्याचबरोबर नाझरे धरणातून रविवारी (दि. 25) सकाळी सहा वाजता कऱ्हा नदीत 759.93 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
कासारसाई धरणातून 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू आहे. परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल.
खडकवासला धरणातून शनिवारी (दि. 24) रात्री 11 वाजता मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामध्ये 2 हजार 64 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे.
पवना धरणातून सांडव्याद्वारे 4 हजार 320 क्युसेक तर पावर हाऊस 1400 क्युसेकने विसर्ग केला जात आहे.
[ad_2]